मित्रांनो, उत्क्रांती आणि विकास या गोष्टी मानवाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्या तरी या दोघांचे काही दुष्परिणाम,साईड इफेक्ट्स आहेत. मला प्रकर्षानी जाणवतोय तो म्हणजे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा,जिम-फिटनेस सेंटर्स,अध्यात्मिक गुरू आणि सत्संग,ध्यान-धारणा-योगा शिकवण्या,आहारतज्ज्ञ, करीयर गायडन्स सेंटर्स,डान्स क्लासेस या सर्वांचे फुटलेले पेव आणि या सर्वांच्या मागे धावून आपलं आयुष्य सुखी-समाधानी करण्यासाठी धडपडणारी जनता! असा समज पसरलाय की हे सर्व केलं नाही तर आपली आणि आपल्या मुलांची मानसिक आणि आर्थिक उन्नती होणारच नाही. मला राहून राहून टाटा-बिर्ला-अंबानी-महिंद्रा या सर्वांचे आश्चर्य वाटते की या सुविधा नसतांनाही इतकी प्रगती कशीकाय केली बुवा यांनी,नशीबच म्हणायचं नाही का! खरंतर इंटरनेटची उपलब्धी आणि त्याचा व्यापक वापर यामुळे ज्ञानाची द्वारे उघडी झालीयत,पण बरेचदा याचमुळे अर्धवट ज्ञान मिळून मनाचा गोंधळच जास्ती होतो आणि याचाच फायदा ही क्लासेसवाली मंडळी पैसा कमावण्यासाठी घेतात. अशा प्रकारच्या क्लासेस,कार्यशाळेत जाणे हे श्रीमंत मंडळीत प्रतिष्ठेचे लक्षण समजल्या जाऊ लागलंय( status symbol),पण गरीब ल...