Skip to main content

Posts

Showing posts from 2018

*माझा हार्मोनिका प्रवास आणि तालाशी झटापट*

संगीत या प्रकाराशी लहानपणापासूनच काही फारसे सख्य नव्हते माझे.शाळेची पूर्ण वर्षे अभ्यास आणि मैदानी खेळ यातच गेला.शाळेतून घरी आल्याबरोबर दप्तर फेकले,कपडे बदलले,आणि आईनी तयार ठेवलेले दूध-बिस्कीट खाल्लं,की लगेच बाहेर! गोट्या,विटीदांडू,लगोरच्या,क्रिकेट, कबड्डी,आणि पावसाळ्यात खुपसणी हे ठरलेलं असायचं.आठवी-नववीत टेबल टेनिसची गोडी लागली,आणि १९९० सालापासून टेनिसची,ती मात्र आजतागायत पर्यंत कायम आहे! शनिवार-रविवारी दुपारी गळ्यात गुल्लेर,ज्याला खान्देशात "क्याटी"म्हणायचे,आणि खिशात गोटे घेऊन चिंचा, गोराटीम्बल्या,ज्याला आम्ही इंग्लिश चिंचा असेही म्हणायचो,आणि कैऱ्या तोडून खाण्याचा कार्यक्रम व्हायचा!(आणि सोबत आमच्या गोट्यानं कौलं फुटल्यामुळे बोलणी खाण्याचाही)  खिशात तिखट-मिठाच्या पुड्या ठेवलेल्या असायच्या लावून खायला!पाणी सुटलं ना तोंडाला?असो!  अंधार पडला की घरी परतायचे,हातपाय-तोंड धुवून शुभंकरोती म्हणायची,टाकणं टाकल्यासारखा गृहपाठ करायचा,जेवायचं आणि झोपायचं असा दिनक्रम असे,यात संगीतासाठी होता कुठं वेळ? शाळेतही वक्तृत्व किंवा वादविवाद स्पर्धेत भाग घ्यायचो पण गायन....छे,आम्हीही कधी प्रयत्न

"ऑपरेशन"* नावाचा एक सोहळा!"

एवढ्यात आमच्या एका अगदी "सक्ख्या" मित्राचे हर्नियाचे ऑपरेशन झाले! ठरल्या दिवशी ते दोघेच पती-पत्नी आले,ऑपरेशन झाल्यावर त्यांच्यासोबत फक्त एक मित्र होता रात्री झोपायला,इतर कुणालाच सांगितले नसल्यामुळे एकही जण त्या दोन दिवसात भेटायला आला नाही,तिसऱ्या दिवशी सकाळी ते घरी गेलेसुद्धा! ते " कोकणस्थ" होते आमच्याचसारखे हे सूज्ञ लोकांना लक्षात आलेच असेल!😜 खान्देशात याउलट चित्र असते. ऑपरेशनची तारीख ठरली,की सर्व नातेवाईक-इष्टमित्र-सगेसोयरे यांना फोनने कळविण्यात येते,फोन नव्हते तेंव्हा पोस्टकार्ड लिहिल्या जायचे.मी स्वतः पाहिलंय, बायकोच्या ऑपरेशनची तारीख ठरली की नवरा तिला घरी सोडून मोठया पोस्ट-ऑफिस मध्ये जाऊन शंभर पोस्टकार्ड आणायचा आणि दुसऱ्या दिवशी एकच मजकूर असलेली ती कार्डे रवाना सुद्धा  व्हायची! मग किती लोक येतील याचा अंदाज बांधून त्यांची रहाण्या-जेवणाची सोय काही आपल्या घरात,काही जवळच्या नातेवाईकांकडे,इतर जवळच्या मित्रांकडे,या सर्वांचे नियोजन व्हायचे. ऑपरेशनच्या दिवशी पेशन्ट सोबत बराच मोठा ताफा ऍडमिट होतांना हजर.आता यात जवळचे किती,खरच काळजीने आलेले किती आणि नुसतं तोंड

My Video

We must stop complaining about this British officer or that officer,this law or that law. There is no end to that. Our movement must not be limited to being against any particular law,but it must be for acquiring the authority to make laws itself. In other words,we want absolute independence. These were the words of Vinayak Damodar Savarkar, one of the greatest freedom fighters,whose leadership had given a new direction to India's freedom struggle. I fondly remember him on this Independence day as the first one demanding a Total Independence! He was a patriot to the core since the tender age of 11. While studying,he joined "Abhinav Bharat"an organisation working for India's freedom struggle. He went to London for studying Law,where he helped instruct a group of  Indian revolutionaries  Due to his association with the freedom struggle,the British government arrested him in 1910 sentenced him to Life imprisonment. He was sent to cellular jail in Andaman

दुनिया झुकती है,झुकानेवाला चाहीये!

मित्रांनो, उत्क्रांती आणि विकास या गोष्टी मानवाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्या तरी या दोघांचे काही दुष्परिणाम,साईड इफेक्ट्स आहेत. मला प्रकर्षानी जाणवतोय तो म्हणजे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा,जिम-फिटनेस सेंटर्स,अध्यात्मिक गुरू आणि सत्संग,ध्यान-धारणा-योगा शिकवण्या,आहारतज्ज्ञ, करीयर गायडन्स सेंटर्स,डान्स क्लासेस या सर्वांचे फुटलेले पेव आणि या सर्वांच्या मागे धावून आपलं आयुष्य सुखी-समाधानी करण्यासाठी धडपडणारी जनता! असा समज पसरलाय की हे सर्व केलं नाही तर आपली आणि आपल्या मुलांची मानसिक आणि आर्थिक उन्नती होणारच नाही. मला राहून राहून टाटा-बिर्ला-अंबानी-महिंद्रा या सर्वांचे आश्चर्य वाटते की या सुविधा नसतांनाही इतकी प्रगती कशीकाय केली बुवा यांनी,नशीबच म्हणायचं नाही का! खरंतर इंटरनेटची उपलब्धी आणि त्याचा व्यापक वापर यामुळे ज्ञानाची द्वारे उघडी झालीयत,पण बरेचदा याचमुळे अर्धवट ज्ञान मिळून मनाचा गोंधळच जास्ती होतो आणि याचाच फायदा ही क्लासेसवाली मंडळी पैसा कमावण्यासाठी घेतात. अशा प्रकारच्या क्लासेस,कार्यशाळेत जाणे हे श्रीमंत मंडळीत प्रतिष्ठेचे लक्षण समजल्या जाऊ लागलंय( status symbol),पण गरीब ल

Senseless Sense of Well Being

Hello friends. There are a few side effects of development. The one I am seeing obviously is the spurt of Wellness-Fitness centers,Gymnasiums,Spiritual Gurus holding Satsangs,verious diet planners,Weight loss-inch loss centres,Personality development courses,Career guidance centres & many more.We feel that unless we do such courses,we & our children cannot progress, be successful,wealthy & achieve peace of mind. I wonder how the  previous generation managed to do well without having the advantages of these schools. The Tatas,Birlas,Ambanis, Mahindras must have been real lucky,isn't it! Infact,the advent of internet,it's widespread use, resulting in an outburst of knowledge(many times incomplete & confusing) has changed the psyche of the people & these agencies take advantage of this situation to make money. This has become a status symbol amongst the riches,who can afford,but the poor are also lured & made to spend in an attempt to uplift their

ईस्माईलभाई!

सन १९९०. माझा दवाखाना "पडून "(खान्देशातील बोलीभाषेप्रमाणे सर्व नवीन व्यावसायिक ठिकाणे,जसे दवाखाने,दुकाने,हॉटेल्स ई. सुरू न होता "पडतातच!") जेमतेम सव्वा वर्ष झालेलं,उत्साह ऐन भरात,पण दवाखान्यात फारसं काम नसायचं,आणि रिकामा वेळ भरपूर असायचा.सकाळी तीन तास टेनिस,एखाद-दोन तास दवाखान्यातच माझ्या जया आणि शशी नावाच्या कम्पाउंडर्स सोबत व्यायाम,चहापान,दुपारी डॉ विजय भंगाळे पॅथॉलॉजिस्ट यांच्या लॅबमध्ये गप्पा आणि वसंत टॉकीज समोरच्या टपरीवाल्याची भजी,मग रात्रीचे जेवण झालं की गाठायचं मुन्सीपालटी हॉस्पिटल.आमचे मित्र डॉ.शरद पाटील तिथे मेडिकल ऑफिसर होते,तिथे अड्डा जमायचा गप्पांचा, मी,डॉ.मंगेश खानापूरकर,डॉ. विकास कोळंबे,डॉ.अनिल चौधरी आणि शरद! समोरच्या कल्पना रसवंती मधून कधी एक्सप्रेसो कॉफी तर कधी उसाचा रस! अशाच एका रात्री मी आणि शरद दोघेच बसलो होतो गप्पा करत,तेवढ्यात एक पेशन्ट आला.त्याला हनुवटीवर बरीच खोल आणि मोठी जखम झाली होती सायकलच्या अपघातात पडल्यामुळे.अशा केसेस मेडिको-लिगल आणि गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे जळगावला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवल्या जायच्या,तशीच यालाही पाठवण्याची त

Looking Back.......

The society's viewpoint regarding the Medical Profession (doctors of various specialities,super-specialities,sub-specialities,the pharma industry,the diagnostic centres,the corporate multispeciality hospitals) has changed tremendously in last 40-50 years. It is due to the scientific advances,knowledge outburst on internet,influence of social media,political wills-wishes & nuances & overall development of the nation as such. As a medical professional, a participant & a witness to all  this,when I look back,what I feel,I have analyzed & tried to pen down. It is my honest observation & is not meant to malign or harm anybody. When I was young,there was no need to go to a doctor,as my father himself was a doctor. When I went to Akola for my pre-meds,in 1976,I had to go to a doctor for the first time. It was a well known general practitioner,Dr Sanghvi. He was famous for his short temper & used to believe in giving injections to each & every patient,

चहा

चहा आज सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर आईच्या हातचा पहिल्या वाफेच्या चहाचा आस्वाद घेत आणि सोबत चौकीदाराने जिन्याच्या जाळीत अडकवलेले वर्तमानपत्र चाळीत गच्चीतल्या झोपाळ्यावर बसलो होतो,आणि गर्मीनं दिवसभर अंगाची लाही लाही करणाऱ्या ग्रीष्म ऋतूच्या सकाळच्या वेळच्या थंडगार झुळुकेची मजा घेत होतो. सुरुवात करतांना पहिला घोट बशीत ओतलेल्या चहाचा घ्यायचा आणि एकदा तो किती गरम आहे याचा अंदाज आला,की उरलेला मग कपाने प्यायचा हा शिरस्ता! यामागे दोन उद्देश : एक,जीभ भाजण्याची भीती नाही,आणि दोन,कपातल्या चहाची लेव्हल कमी झाल्याने पेपरात अर्धे लक्ष्य असल्यामुळे हिंदकळून गरम चहा अंगावर सांडण्याचीही भीती नाही.असो. दोन वर्षांपूर्वी केरळ ट्रीपला गेलो असतांना, मुन्नारला भेट दिली होती,त्याठिकाचे सुंदर चहाचे मळे आणि चहा बनवण्याच्या फॅक्ट्रीची भेट आठवली.तिथे ऐकलेल्या चहाच्या इतिहासाची उजळणी थोडक्यात करतो. कॅमेलिया सायनेन्सिस असे बोटॅनिकल नाव असणाऱ्या चहाचा उगम हजारो वर्षांपूर्वी चीनमध्ये झाला.त्यानंतर जवळजवळ जगातील सर्वच देशात त्याचा वापर होऊ लागला.चहाच्या उत्पादनावरील चीनची मक्तेदारी संपवण्यास ब्रिटिशांनी भारत आ

सिझेरियन, धरलं तर चावतंय,सोडलं तर पळतंय!

सिझेरियनचा उल्लेख इतिहासात प्रथम १५८१ व १५९८ सालात मिळतो.सिझेरीयन या शब्दाचा उगम नक्की माहीत नसला तरी ज्युलियस सिझरचा जन्म या प्रकाराने झाला अशी वदंता आहे.सिझेरियन शब्द लॅटिन भाषेतील कॅडेर (Cadere) या शब्दावरून आला असावा.कॅडेर म्हणजे कापणे(To cut)अशा प्रकारे जन्मलेल्या मुलांना सिझन्स (Caesons)म्हणतात.बऱ्याच धर्मातील पौराणिक कथांमधून पोट कापून देवी-देवतांच्या जन्माच्या कथा आहेत,उदा.ग्रीक पौराणिक कथेत त्यांच्या औषधशास्त्राचे देव अस्क्लेपियस यांचा जन्म त्यांचे वडील अपोलो यांनी त्यांची आई कोरोनीस यांचे सिझेरियन करून केला.नोंदविल्या गेलेली सिझेरियन डिलिव्हरी सन १८०० च्या काळात आढळते. सन १८४६ मध्ये भूल देण्यासाठी "ईथर" चा शोध लागला.त्यानंतर "क्लोरोफॉर्म" चा वापर राणी व्हिक्टोरियाने आपल्या दोन्ही अपत्यांच्या डिलीवरीसाठी केला. त्यावेळी मोठा प्रश्न होता जीवघेणा रक्तस्त्राव आणि जखमेत होणारा जंतुसंसर्ग!(Infection) १८६० मध्ये सर जोसेफ लिस्टर यांनी त्यासाठी कार्बोलीक ऍसिडचा वापर सुरू केला त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करतांना दरवेळी नवीन धुतलेले,स्वच्छ  कपडे वापरणे,हातमोजे बदल