Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

टेलिमेडिसीन

टेलीमेडिसिन  मित्रांनो,लॉक डाऊन सुरू झालं, आणि सर्वांना घरीच राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या. मग असाही  सल्ला दिला गेला की छोट्या-मोठ्या त्रासासाठी दवाखान्यात येऊ नका, फोनवरच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि इथून सुरू झाले टेलीमेडिसीन. याची कथा मी तुम्हाला सांगणार आहे.  टेलीमेडिसीन सुरू झाल्यावर माझ्या मोबाईलवर मी नाव नसलेले नंबर सुद्धा उचलणे सुरू केले आणि मग कुणाचा फोन आहे हे कळण्यासाठी म्हणून ट्रूकॉलर हे ॲप वापरणे सुरू केले आणि यावर कसा विश्वास ठेवावा हे कळेना, त्याचं नाव ट्रूकॉलर की फॉल्स कॉलर असा संभ्रम मला पडला. गंमत म्हणजे ट्रू-कॉलर लावल्यावर मलाच माझ्या पॉप्युलॅरिटी चा आनंद व्हायला लागला, कारण की बरेच फोन केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश,दिल्ली किंवा जम्मू-काश्मीर असेच दाखवू लागले. जम्मूहुन फोन आला,मी हिंदीत बोलायला सुरुवात केली,तर  तिकडून प्युअर खान्देशी भाषेत बोलू लागला माणूस शेजारच्या कुर्हे गावाहून! पण छान वाटत होतं की टेलीमेडिसीनने आपण लॉक डाऊनला आपल्या परीने हातभार लावतोय म्हणून.  लवकरच माझा भ्रमनिरास झाला, याची दोन कारणं आहेत एक म्हणजे लोकांना कनव्हीन्स करणं कठीण, की म