Skip to main content

Posts

Showing posts from May, 2018

चहा

चहा आज सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर आईच्या हातचा पहिल्या वाफेच्या चहाचा आस्वाद घेत आणि सोबत चौकीदाराने जिन्याच्या जाळीत अडकवलेले वर्तमानपत्र चाळीत गच्चीतल्या झोपाळ्यावर बसलो होतो,आणि गर्मीनं दिवसभर अंगाची लाही लाही करणाऱ्या ग्रीष्म ऋतूच्या सकाळच्या वेळच्या थंडगार झुळुकेची मजा घेत होतो. सुरुवात करतांना पहिला घोट बशीत ओतलेल्या चहाचा घ्यायचा आणि एकदा तो किती गरम आहे याचा अंदाज आला,की उरलेला मग कपाने प्यायचा हा शिरस्ता! यामागे दोन उद्देश : एक,जीभ भाजण्याची भीती नाही,आणि दोन,कपातल्या चहाची लेव्हल कमी झाल्याने पेपरात अर्धे लक्ष्य असल्यामुळे हिंदकळून गरम चहा अंगावर सांडण्याचीही भीती नाही.असो. दोन वर्षांपूर्वी केरळ ट्रीपला गेलो असतांना, मुन्नारला भेट दिली होती,त्याठिकाचे सुंदर चहाचे मळे आणि चहा बनवण्याच्या फॅक्ट्रीची भेट आठवली.तिथे ऐकलेल्या चहाच्या इतिहासाची उजळणी थोडक्यात करतो. कॅमेलिया सायनेन्सिस असे बोटॅनिकल नाव असणाऱ्या चहाचा उगम हजारो वर्षांपूर्वी चीनमध्ये झाला.त्यानंतर जवळजवळ जगातील सर्वच देशात त्याचा वापर होऊ लागला.चहाच्या उत्पादनावरील चीनची मक्तेदारी संपवण्यास ब्रिटिशांनी भारत आ

सिझेरियन, धरलं तर चावतंय,सोडलं तर पळतंय!

सिझेरियनचा उल्लेख इतिहासात प्रथम १५८१ व १५९८ सालात मिळतो.सिझेरीयन या शब्दाचा उगम नक्की माहीत नसला तरी ज्युलियस सिझरचा जन्म या प्रकाराने झाला अशी वदंता आहे.सिझेरियन शब्द लॅटिन भाषेतील कॅडेर (Cadere) या शब्दावरून आला असावा.कॅडेर म्हणजे कापणे(To cut)अशा प्रकारे जन्मलेल्या मुलांना सिझन्स (Caesons)म्हणतात.बऱ्याच धर्मातील पौराणिक कथांमधून पोट कापून देवी-देवतांच्या जन्माच्या कथा आहेत,उदा.ग्रीक पौराणिक कथेत त्यांच्या औषधशास्त्राचे देव अस्क्लेपियस यांचा जन्म त्यांचे वडील अपोलो यांनी त्यांची आई कोरोनीस यांचे सिझेरियन करून केला.नोंदविल्या गेलेली सिझेरियन डिलिव्हरी सन १८०० च्या काळात आढळते. सन १८४६ मध्ये भूल देण्यासाठी "ईथर" चा शोध लागला.त्यानंतर "क्लोरोफॉर्म" चा वापर राणी व्हिक्टोरियाने आपल्या दोन्ही अपत्यांच्या डिलीवरीसाठी केला. त्यावेळी मोठा प्रश्न होता जीवघेणा रक्तस्त्राव आणि जखमेत होणारा जंतुसंसर्ग!(Infection) १८६० मध्ये सर जोसेफ लिस्टर यांनी त्यासाठी कार्बोलीक ऍसिडचा वापर सुरू केला त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करतांना दरवेळी नवीन धुतलेले,स्वच्छ  कपडे वापरणे,हातमोजे बदल

डॉक्टर्स डे!

१ जुलै २०१३. डॉक्टर्स डे!  भारत रत्न डॉ.बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस व पुण्यतिथी (दोन्ही एकाच दिवशी) भारतभर त्यांच्या सन्मानार्थ "डॉक्टर्स डे" म्हणून साजरा केल्या जातो. भुसावळ इंडियन मेडिकल असोसिएशन ने डॉ.प्रवीण महाजन यांच्या धन्वंतरी ब्लड बँकेच्या विद्यमाने त्यादिवशी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं,आयएमए सभागृहात. त्यात भुसावळ आयएमए च्या सर्व सदस्यांनी रक्तदान करण्याचे ठरविले होते. मी व सुजातानीही सायंकाळी साडेचारच्या सुमारास जाऊन रक्तदान केले. त्यानंतर चहा-कॉफी आणि जमलेल्या डॉक्टर मंडळींशी गप्पागोष्टी असा कार्यक्रम आटोपून आम्ही स्कुटरवर घरी जायला  निघालो. हंबर्डीकर चौकात दत्त बेकरीच्या समोर बरीच गर्दी पाहिली आणि काय भानगड आहे हे पहायला आम्ही थांबलो.पाहतो तर एक विशीचा तरुण रस्त्यात पडला होता आणि लोक त्याला कांदा-चप्पल सुंघव असा प्रकार करत होते. (अशा वेळी बहुतेक लोक नुसते बघ्यांचे काम करत असतात पण काही हुशार लोक '"चक्कर आली असेल,पाणी पाजा","ए,पाणी शिंपडा तोंडावर,आत्ता उठेल","कांदा सुंघवा,नाहीतर चामड्याची चप्पल आणा"असे सर्व अशास्त्रीय उद

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

*"अनुसूयाबाई"*

१४ फेब्रुवारी १९९१. आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता,कारण सुजाता आणि मधुरा औरंगाबादहून भुसावळला आले होते.सुजाता घाटी हॉस्पिटलला एम.डी. करत होती आणि मधुरा नऊ महिन्याची होती फक्त,त्यामुळे तिच्याचजवळ औरंगाबादला रहायची.सुजाताचे वडील,मेजर दिनकरराव बाब्रस यांचे घर घाटी हॉस्पिटलच्या जवळच असल्यामुळे मधुराला तिथेच ठेवणे सोपे गेले.दिनकररावांनी त्या सुमारास मारुती ८०० ही त्यांची पहिली-वहिली नवी कोरी गाडी घेतली होती आणि ते स्वतः गाडी चालवीत सुजाता व लहानग्या मधुराला घेऊन आले होते एक दिवसाकरता फक्त- कारण....त्या दिवशी सुजाताचा वाढदिवस होता!🎂 त्या दिवशी आम्ही ओपीडीही कमीच बघायचे ठरवले होते आणि एकही ऑपरेशन ठेवले नव्हते,कारण,जास्तीतजास्त वेळ मधुरा सोबत घालवायचा होता! एकंदरीत सर्व आनंदीआनंद होता. सकाळचे साडेदहा वाजले होते,आमचे पेशन्ट पाहणे सुरू झाले होते.सर्व कसे छान,आरामात सुरू होते.एवढ्यात बाहेर काहीतरी आरडाओरडा ऐकू आला.जाऊन पहातो तो काय...एका अत्यवस्थ गरोदर स्त्रीला ३-४ माणसे उचलून आणत होती.मी ताबडतोब स्ट्रेचर मागविला आणि  त्या पेशन्टला तपासणी कक्षात आणले. डोंगरकठोरा गावाची आदिवासी स्त्री,न

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ

*"नाटक : एका डॉक्टरच्या नजरेतून"*

*"नाटक : एका डॉक्टरच्या नजरेतून"* महाराष्ट्र,मराठी माणूस आणि रंगभूमी यांचं एक अतूट नातं आहे.महाराष्ट्रानी एकाहून एक दिग्गज कलाकार  आपल्याला दिले आहेत आणि आपणही त्यांच्या अजरामर कलाकृतींना भरभरून प्रतिसाद देतांना त्यांच्याशी जणू समरसच झालो आहोत.नाटक......मग ते रंगभूमीवरील असो,टीव्ही मालिकेतील असो,की सिनेमातील असो,त्या गोष्टी अगदी प्रत्यक्षातच घडतायत असे तात्पुरते वाटणे यातच त्यांचे यश आहे! एक डॉक्टर या नात्यानं याकडे पाहतांना एक विचार मनात येतो : रंगभूमीवरील घटना या पात्रांमुळे वास्तविक असल्याचा आभास निर्माण होतो,पण प्रत्यक्ष  आयुष्यात,जग या एका विशाल रंगमंचावर आपण सर्वच जण नट-नट्या म्हणून भूमिका निभावत असतो. जन्मल्यानंतर थोड्याच दिवसात आपल्याला या नाटकाचे धडे मिळू लागतात.नाटक करून,म्हणजे रडून,जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे,त्याशिवाय कुणी दूध पाजणार नाही,ओले कपडे बदलून देणार नाही,बाहेर फिरवणार नाही- इथून श्रीगणेशा होतो नाटकाचा. थोडं मोठं झाल्यावर हवं त्या गोष्टी मिळण्यासाठी आई-वडिलांकडे हट्ट करणे,शाळेत जायचा कंटाळा आल्यावर पोट दुखण्याचे नाटक करणे,शाळेत उशीर झाल्यावर

सुश्रुषेचे मोल अनमोल.💐

रुग्णसुश्रुषा (नर्सिंग) व्यवसायासला प्रतिष्ठा देणारी नर्सिंगचे आद्य प्रणेती फ्लोरेन्स नाईटिंगेलचा १२ मे हा जन्मदिवस जागतिक नर्सिंग डे म्हणून साजरा केल्या जातो.त्या अनुषंगाने फ्लोरेन्स नाईटिंगेल व नर्सिंग व्यावसायिक यांची महती विशद करणारा हा लेख. इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सिंगने घेतलेल्या निर्णयानुसार फ्लोरेन्स नाईटिंगेलच्या जन्मदिनानिमित्ताने १२ मे हा दिवस जागतिक नर्सिंग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. १२ मे १८२० रोजी एका धनाढ्य ब्रिटिश कुटुंबात जन्मलेली फ्लोरेन्स अतिशय सुंदर व गुणी मुलगी.तिच्या आयुष्याची ध्येये सुरुवातीपासूनच वेगळी होती.तिला गरीबांची व रुग्णांची शुश्रूषा करण्याची उपजतच आवड होती. हे ध्येय गाठण्यासाठी लग्न अडसर ठरणार म्हणून ती अखेरपर्यंत अविवाहित राहिली.तिच्या म्हणण्यानुसार तिला वयाच्या १७ व्या वर्षीच ईश्वराने दर्शन देऊन सुश्रुषेची प्रेरणा दिली.१८५१ मध्ये फ्लोरेन्सने जर्मनीतील कैसरवर्थ येथे नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले.त्याकाळी नर्सिंग व्यवसायाला समाजात प्रतिष्ठा नव्हती व अशा स्त्रियांकडे समाज तुच्छ नजरेने पहात असे.१८५३ मध्ये ब्रिटनमध्ये परत आल्यानंतर तिची नर्सिंग स्कु

"भटक्या कुत्र्यांची जीवघेणी समस्या"

आज सकाळी वर्तमानपत्र उघडताच जळगावात"भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यानं फोडला बालिकेचा डोळा" ही हृदयद्रावक बातमी वाचली. पंधरा दिवसांपूर्वी भुसावळला हनुमान नगरातील एकतीस वर्षाच्या तरुणाचा गाडीवर जात असतांना कुत्री मागे लागल्यामुळे तोल जाऊन गाडी पडली व डोक्याला इजा होऊन मृत्यू झाला. जळगावचा एक प्लंबर आणि मुंबईच्या कांदिवलीत एक बालक हेसुद्धा पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळं मृत्युमुखी पडल्याच्या घटना आत्ताआत्ताच्याच आहेत. भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्यामुळे होणारे अपघात यांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. पहाटे मॉर्निंग वॉकला जातांना नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.माझ्याकडे रात्री-बेरात्री इमर्जन्सी केससाठी येणारे अनेस्थेटीस्ट, कुत्र्यांच्या  दहशतीमुळे सोप्या असलेल्या टू व्हीलरवर न येता जिकिरीच्या फोर व्हीलरवर येतात बिचारे! या सर्वांना कारणीभूत आहेत "पिपल फॉर अनिमल्स" या दिल्ली येथील संस्थेच्या अध्यक्षा आणि राष्ट्रीय प्राणिहक्क आयोगाच्या श्रीमती मनेका गांधी! १९९३ पासून त्यांच्या चळवळीमुळे भटक्या कुत्र्यांना मारण्याऐवजी त्यांचे निर्बीजीकरण

*फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात*

*फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात* मित्रांनो,खरं सांगू? पोह्यांपेक्षा कोणती लाडकी डीश असेल माझी नाश्त्यासाठी तर ती म्हणजे फोडणीची पोळी आणि नंबर दोनवर फोडणीचा भात! मला खात्री आहे की आक्ख्या महाराष्ट्रात फोडणीची पोळी आवडत नाही किंवा माहीत नाही अशी एकही व्यक्ती नसेल! भुसावळला आई आणि नागपूरला आज्जी,दोघी फोडणीची पोळी करण्यात एक्सपर्ट! आणि मित्रांनो,अजून एक खासियत म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या हातची फोडणीची पोळी वेगळीच चव घेऊन जन्मास येते.माझ्या एका मित्राची आई हळद फोडणीत न टाकता नंतर वरून टाकायची,त्याचीही चव छान असायची.फोडणीची पोळी मात्र शिळ्या पोळ्यांचीच करावी लागते. मी तर रात्रीच्या जेवणात कमी पोळ्या खाऊन मुद्दाम त्या दुसऱ्या दिवशी फोडणीच्या पोळीसाठी उरवायचो! अजून एक गम्मत म्हणजे पोळ्या हातानीच कुस्करल्या पाहिजेत बरंका,मिक्सरमधून काढल्या की इतक्या बारीक होतात की डिशचा बल्ल्या वाजलाच म्हणून समजा! मस्तपैकी कांदा-टमाटू-कढीपत्ता-लाल मिरची-हिरवी मिरचीची फोडणी,त्यावर चिरलेली ताजी कोथिंबीर,व्वा! मराठवाड्यात शेंगदाणे टाकतात फोडणीत किंवा भाजून सोबत खातात. आणि मला ही चमच्यानी न खाता हातानीच खायला आव

*कचोरी*

*कचोरी* कचोरी हा खाद्यप्रकार कुठे उगम पावला कुणास ठाऊक,परंतु देशाच्या कान्याकोपऱ्यात मिळतो हे मात्र नक्की!  कचोरीशी माझी पहिली गाठ(खरं तर तिची माझ्याशी!) पडली ती म्हणजे मी लहान असतांना आजोळी अकोल्याला जायचो भुसावळहून तेंव्हा शेगाव स्टेशनवर बाबा उतरून त्या खोमचेवाल्याकडून कचोऱ्या घ्यायचे.कोण गर्दी करायचे लोक ती कचोरी खरीदायला म्हणून सांगू,गाडी थांबणार इनमीन तीन मिनिटे,खोमचेवाले पाच आणि घेणारी मंडळी शेकडोनी.म्हणजे शेगाव प्लॅटफॉर्म यायच्या आधीच मंडळी दाराशी गर्दी करायची उतरायला.कचोऱ्या मिळाल्यावर कोण आत्मिक समाधान झळकायचं त्यांच्या चेहेऱ्यावर! त्यावेळी प्रत्येक गाडीच्या वेळी गरम कचोऱ्या आणायचे विकायला आणि अतिशय चविष्ट असायच्या त्या,रेल्वेनं पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे,देशभर घेऊन जायचे लोक. आता मात्र ती क्वालीटी राहिली नाही,थंड-गारगोटी झालेल्या कचोऱ्या असतात,आतमध्ये नावालाच मसाला असतो,सोबत कच्या हिरव्या मिरच्या देतात,परंतु आजही लोक तितक्याच श्रेद्धेनी त्या घेतात,असो. त्यापेक्षा छान कचोऱ्या नांदुरा स्टेशनवर मिळतात.पांढरी गांधीटोपी आणि पिळदार मिश्या असलेल्या एका गृहस्थाचा स्टॉल आहे अप प्लॅ

"चिंटू"

"चिंटू" गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल,नागपूर,जुलै १९८५ ची घटना आहे,माझा सर्जरीचा हाऊसजॉब संपून दुसरा जॉब ऑर्थोपेडिक्स मध्ये सुरू झाला होता.तो रविवार होता आणि चोवीस तासाची इमर्जन्सी ड्युटी लागली होती. ती कॅज्युअलटी मध्ये सीएमओ सोबतच बसून करायचो,कारण मारामाऱ्या, अपघात यामधील हाडांशी निगडित जखमा आम्हालाच बघून उपचार करावे लागायचे,त्यामुळे तिथेच सुरवातीला बघून इमर्जन्सी ट्रिटमेंट देऊन मग वॉर्ड किंवा ऑपरेशन थिएटर मध्ये हलवणे सोयीस्कर असायचे. आठ वाजता सुरू झालेल्या ड्युटीत साडेदहा वाजेपर्यंत दोनचार किरकोळ अपघाताच्या केसेस (ज्यात फक्त प्लास्टर घालून काम भागले) सोडल्या तर बाकी बऱ्यापैकी आराम होता आणि आम्ही तिघे रेसिडेंटस सीएमओ बरोबर समोरच्या कँटीन मधून चहा मागवून पीत बसलो होतो,पण हे माहीत नव्हतं की ती वादळापूर्वीची शांतता होती! अकरा वाजले आणि सुसाट आलेली एक पोलीस जीप कॅज्युअलटी च्या दारात येऊन थांबली.चार हवालदारांनी पटकन आवाज देऊन स्ट्रेचर मागवला आणि एका दहाबारा वर्षाच्या मुलाला जीपमधून उचलून स्ट्रेचरवर टाकून आत आणले.आम्ही ताबडतोब त्याला टेबलवर घेतले,त्या मुलाचे दोन्ही पाय ट्

"क्रिकेट मॅनिया"

"क्रिकेट मॅनिया" सध्या आयपीएल ने भारावलेलं वातावरण आहे.रोज संध्याकाळी कधी एक तर कधी दोन मॅचेस चालू आहेत,कोणतीही टीम असो,ग्राउंड प्रेक्षकांनी फुल्ल! त्यांच्या लाडक्या टीमचा युनिफॉर्म घातलेले,रंगीबेरंगी टोप, रंगवलेली तोंडं, हातात फलक, चौका किंवा छक्का मारला,की तोकडे कपडे घालून नाच करणाऱ्या चियर-गर्ल्स,एयर कंडिशंड बॉक्सेस मध्ये बसलेले टीमचे मालक(शाहरुख-अंबानी-प्रिटी झिंटा....विजय माल्याची कमी जाणवतेय मात्र!) करोडो रुपये खर्च करून विकत घेतलेले निरनिराळ्या देशांचे हे प्लेयर्स,हजारो रुपये खर्च करून पहायला आलेले प्रेक्षक आणि थेट प्रक्षेपण करून अब्जावधी रुपये कमावणाऱ्या वाहिन्या.........वेळ आणि पैसा याचा जमाखर्च माझ्या बुद्धीच्या कुवतीबाहेरचा आहे!😇😇  या अनुषंगानं मागे आपण टी-ट्वेन्टी विषवचषक जिंकला त्यावेळची आठवण आली.सारे भारतवर्ष आनंदाने न्हाऊन निघाले होते,भारतीय असण्याचा सार्थ अभिमान प्रत्येकाला वाटू लागला होता.विजयी चमूचे धडाकेबाज स्वागत आपण केले आणि सहार विमानतळ ते वानखेडे स्टेडियम अशी पस्तीस किलोमीटरची भव्य मिरवणूक आपण काढली.स्टेडियमवर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षिसां

"खलील"

"खलील" १९८४ डिसेंम्बर,मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज  नागपूर,एम.बी.बी.एस.करून,एक वर्षाची इंटर्नशिप करून पुढे एम.एस.जनरल सर्जरी करण्याची सुरुवात म्हणून,सर्जरी डिपार्टमेंट मध्ये हाऊस ऑफिसर(त्यावेळचं नाव,आत्ताचं-ज्युनियर रेसिडेंट)म्हणून रुजू झालो. मला हेड ऑफ दी डिपार्टमेंट डॉ.एन.के.देशमुख यांचा वॉर्ड नं.७ मिळाला. आता थोडक्यात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये काम कसे चालते ते पाहू : प्रत्येक स्पेशालिटीचे एकेक डिपार्टमेंट असते,जसे-सर्जरी,गायनिक,मेडिसिन,पीडियाट्रीक,ऑपथॅलमोलॉजी,इएनटी,ऑर्थोपेडिक वगैरे.प्रत्येक डिपार्टमेंटचे युनिट्स असतात,काम-शिक्षक-विद्यार्थी यांच्या संख्येवर अवलंबून दोन ते सहापर्यंत. प्रत्येक युनिटला एक मेल आणि एक फिमेल वॉर्ड असतो रुग्ण भरती करण्यासाठी.प्रत्येक वॉर्ड मध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास रुग्ण भरती असतात.युनिटच्या ऍडमिशन डे ला त्या चोवीस तासातील सर्व रुग्ण त्या युनिटच्या वॉर्डस मध्ये भरती होतात.आमच्यावेळी दर ऍडमिशन डे ला साधारणतः दोन्ही वॉर्ड मिळून चाळीस रुग्ण भरती व्हायचे. हाऊस ऑफिसर हा वॉर्ड मधील सर्वात ज्युनियर मेम्बर,त्याच्यावर वॉर्डची संपूर्ण जबाबदा

माझ्या आठवणीतील अविस्मरणीय रुग्ण

माझ्या आठवणीतील अविस्मरणीय रुग्ण वैद्यकीय व्यवसायात असे अनेक अनुभव येतात की जे स्मृतीत नेहेमीकरता कोरल्या जातात.असाच एक सुरस आणि विस्मयकारी अनुभव येथे कथन करीत आहे : ३० डिसेंम्बर १९९०,सकाळची वेळ,कडाक्याची थंडी,नवीन व्यवसाय सुरू करून जेमतेम एक-सव्वा वर्ष झालेलं. एक दीड वर्षाचं अत्यवस्थ बाळ बालरोग तज्ञ डॉ.उमेश खानापूरकर यांनी पाठवलं.  बाळाची स्थिती अतिशय नाजूक-पोट टम्म फुगलेलं,नाडी आणि श्वासाची गती खूप वाढलेली,अंगात खूप ताप,हिरव्या उलट्या होतायत,तीन दिवसांपासून शौचास झालेली नाही,मेडिकल भाषेत ज्याला डिहायड्रेटेड टॉक्सिक लुक्स  म्हणतात ते,आणि एक्स रे मध्ये आतड्याला पीळ पडल्याची लक्षणं.......... ऑपरेशन ताबडतोब करणं आवश्यक,नाही केलं तर १०० टक्के मृत्यू ठरलेलाच,पण ऑपरेशन करतांना किंवा त्यानंतर चोवीस तासातही दगावण्याची शक्यता खूपच जास्ती. बरं, त्या काळी आजच्यासारख्या आधुनिक उपकरणांच्या सोयी ऑपरेशन थिएटरमध्ये उपलब्ध नव्हत्या आणि बालरोगशल्यक्रियातज्ञ(Paediatric surgeons) सर्वात जवळ म्हणचे औरंगाबादलाच होते, आणि तिथपर्यंत जिवंत पोहोचण्याची शाश्वती नव्हती. बाळाचे वडील सैन्यात होते,आणि नशिब

वकिलसाहेब

मित्रांनो,आमच्या डॉक्टरी व्यवसायात निरनिराळे बरे-वाईट अनुभव येतात,काही गमतीदार असतात. त्यातील एक नेहेमीचा अनुभव म्हणजे पेशन्टसोबत येणारे नातेवाईक अथवा मित्र आपण पेशन्ट तपासत असतांना स्वतःचेच प्रॉब्लेम्स सांगत बसतात किंवा वजनाचा काटा दिसला की स्वतःचे वजन करून घेतात आणि माझेही बीपी तपासून घ्या असा आग्रह करतात,त्यानी मूळ पेशन्टच्या आजाराचे गांभीर्यच नष्ट होते,तो खट्टू होतो आणि डॉक्टरचाही विनाकारण वेळ जातो,असो. यावर चर्चा होत असताना मला अडतीस वर्षांपूर्वीची एक माझ्यासोबत घडलेली गोष्ट आठवली,ती शेयर करतोय. 1984 ची गोष्ट आहे,आम्ही सर्व तेंव्हा इंटर्नशिप करत होतो आणि रिकाम्या वेळात मी गोवर्धन सरांकडे (त्यावेळचे अतिशय नावाजलेले सर्जन)सर्जरी शिकायला जायचो,त्यावेळी त्यांच्या ओपीडीतही असायचो. त्यांच्याकडे फार हाय प्रोफाइल क्लायंट्स असायचे. एकदा एक प्रथितयश वकिलसाहेब आले,तपासणी झाल्यावर सरांनी माझी ओळख करून दिली,तेंव्हा कळले की आमच्या धंतोलीतील घराजवळच या महाशयांचा बंगला आहे.गप्पा झाल्या,मग बाहेर गेल्यावर त्यांनी मला बोलावले,आणि म्हणाले : यंग मॅन,आपण एक काम करूया,मला ब्लड प्रेशर आहे,गोळ्या सुरू

कॉफी हाऊस आणि दोसा!

कॉफी हाऊस म्हंटलं की आठवतो तो म्हणजे माझा लाडका दोसा!साऊथ इंडियन डिश पैकी माझी सर्वात लाडकी डिश!!दोसा मला कधीपासून आवडू लागला नक्की आठवत नाही,पण एकोणीसशे एक्काहत्तर साली,(जेंव्हा मी पाचवीत असीन),त्यावेळी आमच्या भुसावळमधील धनराज हॉटेलमधील(आताचं ममता रेस्टॉरंट) दोसा मी विसरुच शकत नाही.माझी मामी आणि माझ्याहून लहान असणारे दोन मामेभाऊ,अमेरिकेला मामाकडे जायच्या आधी आमच्याकडे आले होते,त्यावेळी धनराज हॉटेलमध्ये खास मद्रासी कारागीर आणले होते आणि माझे बाबा म्हणजे पक्के खवय्ये,त्यांनी पार्सल मागवले होते घरी,ती चव आजतागायत मला कुठेही मिळाली नाहींअसो!अगदी मद्रासच्या सर्वनाज, केरळ ट्रिप मध्ये कमीतकमी दहा ठिकाणच्या खादाडीत किंवा कुर्ग मधील क्लब महिंद्राच्या रेस्तराँ मध्ये! दोसा म्हणजे तांदुळाच्या पिठीचा-उडदाच्या डाळीचा,किंवा रव्याचा, साधा असेल तर नुसताच,त्यावर ती स्पेशल खोबऱ्याची चटणी,आणि मद्रासी सांबार.हा सांबार म्हणजे त्यात आख्ख्या लाल मिरच्या आणि लाल भोपळ्याचे तुकडे हवेतच,अगदी पहिल्याच भुरक्याला ठसका लागायलाच हवा.आणि मसाला दोसा असेल तर त्यात मॅश केलेल्या उकडलेल्या बटाट्याची,बारीक आणि लांब चिरले