एवढ्यात आमच्या एका अगदी "सक्ख्या" मित्राचे हर्नियाचे ऑपरेशन झाले! ठरल्या दिवशी ते दोघेच पती-पत्नी आले,ऑपरेशन झाल्यावर त्यांच्यासोबत फक्त एक मित्र होता रात्री झोपायला,इतर कुणालाच सांगितले नसल्यामुळे एकही जण त्या दोन दिवसात भेटायला आला नाही,तिसऱ्या दिवशी सकाळी ते घरी गेलेसुद्धा! ते " कोकणस्थ" होते आमच्याचसारखे हे सूज्ञ लोकांना लक्षात आलेच असेल!😜 खान्देशात याउलट चित्र असते. ऑपरेशनची तारीख ठरली,की सर्व नातेवाईक-इष्टमित्र-सगेसोयरे यांना फोनने कळविण्यात येते,फोन नव्हते तेंव्हा पोस्टकार्ड लिहिल्या जायचे.मी स्वतः पाहिलंय, बायकोच्या ऑपरेशनची तारीख ठरली की नवरा तिला घरी सोडून मोठया पोस्ट-ऑफिस मध्ये जाऊन शंभर पोस्टकार्ड आणायचा आणि दुसऱ्या दिवशी एकच मजकूर असलेली ती कार्डे रवाना सुद्धा व्हायची! मग किती लोक येतील याचा अंदाज बांधून त्यांची रहाण्या-जेवणाची सोय काही आपल्या घरात,काही जवळच्या नातेवाईकांकडे,इतर जवळच्या मित्रांकडे,या सर्वांचे नियोजन व्हायचे. ऑपरेशनच्या दिवशी पेशन्ट सोबत बराच मोठा ताफा ऍडमिट होतांना हजर.आता यात जवळचे किती,खरच काळजीने आलेले किती आणि नुसतं तोंड...