*हे वय ? हेच वय!* एवढ्यातच आम्ही दोघेही कोव्हीड मधून सुखरूपपणे बरे होवून वापस आलो आहोत त्यामुळे बऱ्याच ठिकाण कोव्हीडचे अनुभव सांगण्यासाठीच्या वेबीनारमधे बोलवतात. परवाच अशा एका शोमधे आमची ओळख करून दिली. आता ओळख करून देतांना छानच बोलतात,इतकं की कधीकधी फारच जास्ती तारीफ होते, आपल्याला आपल्यातील कलागुण आणि स्वभावा बद्दल बरीच नवीन माहिती होते....... म्हणजे तारीफ ऐकायला बरं वाटत हो, उगाच खोटं कशाला बोलू, पण जेंव्हा ते म्हणाले की हे डॉ. केळकर दांपत्य "ह्या" वयातही हामोनिका वाजवायला शिकले आणि छान वाजवितात वगैरे,तेंव्हा मात्र मी बुचकळ्यात पडलो की "ह्या वयात" म्हणजे काय ? कोणती ही गोष्ट शिकायला काय वयाची अट असते का ? आणि असलीच तर तसं कुठे लिहीलंय? अजून पुढे जाऊन त्यांनी सांगितल की या वयातही ते टेबल टेनिस खेळतात आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात भाग घेतात. आणि त्यांचे सध्याचे जागतिक रँकिंग 23 वे आहे. अहो, ते रँकींग ५० ते ५९ वयोगटातील आहे. आणि मी लहान असतो तर या स्पर्धेत भाग घेऊच शकलो नसतो, असो. तर मित्रांनो,"ह्या वयाला"या शब्दाला माझा तीव्र आक्षेप आहे. अहो,हे वय म्हण...