Skip to main content

करोनासे खेलोना!

नमस्कार मित्रांनो!

आज माझ्याकडे एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट.

चांगली ही,की करोना महामारी म्हणजे करोना पॅनडेमीक लवकरच आटोक्यात येण्याची लक्षणे दिसत आहेत.त्याला बरीच कारणे आहेत पण सामूहिक प्रतिकार शक्ती म्हणजे हर्ड इम्युनिटी तयार होणं आणि लवकरच लस म्हणजे व्हॅक्सिन्स बाजारात येणे ही महत्त्वाची कारणे आहेत.

वाईट बातमी ही की पूर्ण महाराष्ट्र राज्यात काल पंधरा हजारावर नवीन केसेस सापडल्या तर जळगाव जिल्ह्यात 540.जिल्ह्यात एकंदरीत आजमितीस वीस हजारावर केसेस आहेत त्यापैकी 700 मृत्यू झालेत आणि मागच्या 24 तासात 12 जण दगावले आहेत,त्यातही मागील 72 तासात खान्देशानी चार प्रसिद्ध डॉक्टर्स जे खऱ्या अर्थाने करोना योद्धे होते, ते गमावलेले आहेत.

मागील पूर्ण आठवडा खूप छान पाऊस झाला आणि हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडल्याची बातमी वाचली पेपर मध्ये त्यामुळे काल संध्याकाळी तापी नदीच्या पुलावर जाऊन नदीचा पूर पाहण्यास गाडी काढून गेलो आम्ही सगळे. दोन गोष्टींनी वैताग आला, पहिली म्हणजे रस्त्यांची झालेली भयानक दुर्दशा आणि दुसरी म्हणजे सर्व सुरक्षा मानकांची ऐसी की तैसी" करणारी गर्दी. रस्त्यांवर इतकं पाणी साठलं होतं आणि इतके खोल खड्डे होते की गाडी आणि आत मध्ये बसलेले आम्ही, सुखरूप घरी पोहोचू की नाही याची खात्री वाटेना. बाजारात गणपती निमित्ताने इतकी गर्दी होती की प्रत्यक्ष गजाननाच्या डोळ्यातही अश्रू आले असतील. मास्क न घालता, सुरक्षित अंतर न पाळता दुचाकीवर सर्रास ट्रिपल सीट फिरत होती मंडळी.रहदारीचे नियम पाळणे तर दूरच पण मोठ्याने हॉर्न वाजवत वेगाने गाडी चालवून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालणारी तरुणाई ज्यात महिलांचाही मोठा सहभाग होता, पाहून खूप वाईट वाटलं.का बरं लोक जीवावर इतके उदार झालेत आणि स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेला पायदळी तुडवायला उतारू झालेत?
ह्याचं खूप सुंदर मानसिक विश्लेषण जळगाव चे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रदीप जोशी यांनी केलं आहे. लॉक डाऊन सुरू झालं तेव्हा इनिशियल रिस्पॉन्स बेफिकिरी चा होता, कारण हा आजार इतका गंभीर आहे याची माहितीच नव्हती, आणि हॅ........,मला काय होतंय म्हणून हिरोगीरी दाखवत होते मास्क न लावता, सुरक्षित अंतर न पाळता फिरत होते.मग काही दिवसांनी जेव्हा आजाराची गंभीरता पटली आणि सरकारी यंत्रणांनी लॉक डाउन न पाळणाऱ्यांवर पोलिसी खाक्या दाखवणं सुरू केलं तेव्हा मग जबरदस्ती घरीच राहू लागले.आणि दुसरा दौर  सुरू झाला ज्याला जोशीसर "हनिमून फेज" म्हणतात. कधी नव्हे  तर इतकी मोठी सुट्टी मिळाली आहे,मज्जा आहे,घरीच बायका मुलांसोबत राहायचं, बायकोला घरकामात मदत करायची, मुलांसोबत खेळायचं, त्यांचा अभ्यास घ्यायचा आणि याचे व्हिडिओज सोशल मीडियावर टाकायचे. कुणाला किती लाइक्स किती कॉमेंट मिळतात याची स्पर्धा करायची. निरनिराळे ऑनलाईन खेळ खेळायचे मित्र-मैत्रिणींच्या व्हाट्सअप ग्रुप वर.एकंदरीत मजेचा काळ होता.
काही दिवसांनी मग तिसरी फेज सुरू झाली कंटाळा येण्याची. वर्क फ्रॉम होम करणारे कंटाळले कारण छान छान कपडे घालून ऑफिस मध्ये जायची आणि प्रत्यक्ष भेटायची मजा बंद झाली.गप्पागोष्टी,गॉसिपिंग, एकत्र डबा खाणं, प्रॉब्लेम्स शेअर करणे सगळं बंद झालं. घरी बसायचं बर्म्युडा आणि टी शर्ट घालून 24 तास. परत कामाच्या वेळाही वाढल्या, रात्री उशिरापर्यंत कॉम्प्यूटरवर काम सुरू. व्यायाम बंद, खाणे वाढलं आणि सोबत वजनही. फॅक्टरी,कारखाने, खाजगी व्यवसाय बंद झाल्यामुळे इन्कम बंद झालं  किंवा घटलं तरी,आणि खर्च मात्र सुरूच.घर भाडं,इलेक्ट्रिक बिल, मोबाईल बिल, मुनिसिपल टॅक्स, इन्कम टॅक्स, काम करणाऱ्या लोकांचे-मजुरांचे पगार... आर्थिक विवंचना सुरू झाल्यात, मग पती पत्नी आणि मुलं यांच्यात खटके उडू लागले,डोमेस्टिक वायलेंस वाढला. भरीस भर म्हणजे सोशल मीडियावर फेक न्युज चा सुळसुळाट त्यामुळे आधीच गोंधळलेला समाज अजूनच बहकला. करोना खरंच आहे की नाही ही या पासून ते हे डॉक्टरांचे पैसा कमवण्यासाठी चे षड्यंत्र आहे आणि एक मोठी आंतरराष्ट्रीय कॉन्स्पिरसी आहे इथपर्यंत.म्हणजे हे चिनने मुद्दाम जगावर लागलेलं जैविक युद्ध आहे हे या सुद्धा अफवा उठल्या. काढे आणि वाफ घ्यायची की नाही,होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बम औषध किती उपयुक्त आहे, सरकारी दवाखान्यातील दुरावस्था आणि खाजगी दवाखान्यानी अवास्तव असं वाटलेलं दिलेले बिल,नुसता गोंधळात गोंधळ. पण जेव्हा मृत्यु दर वाढला आणि आपला जवळचा मित्र किंवा नातेवाईक गमावला तेव्हा करोना खरंच आहे याची जाणीव होऊ लागली आणि माणूस असहाय्य होऊ लागला.हळूहळू निराशेनी माणसं आत्महत्या करू लागली, मन बंड करू लागलं की लॉक डाऊन वाढला तर चिंतेनी,उपासमारीनं मरणार आणि नाहीतर करोनानी मरणार, मग स्वच्छंद आयुष्य जगून मेले तर काय वाईट ही भावना वाढीस लागली. किंवा हर्ड इम्युनिटी आलीय आणि मास्क न लावता फिरलं तर ती वाढते आहे अशी फेक न्युज ऐकली आणि वॅक्सिन तर येणारच आहे म्हणून हे लोक बेफिकीर होऊन फिरू लागले. स्वतःच्या आणि त्यापेक्षा कोमोरबीडीटी असलेल्यांचा आणि आबालवृद्धांचा जीव धोक्यात घालू लागले.मित्रांनो,हे ठीक नाही.याची कम्पॅरिझन मी क्रिकेटच्या वन-डे मॅच शी करतो.बघा,आता विजय दृष्टिक्षेपात आला आहे आणि टारगेट केवळ दोनशे सव्वादोनशे रन्स आहे. आपल्याकडे चार नावाजलेले बॅट्समन आहेत आणि चार ऑलराऊंडर्स,जे मॅच विनिंग खेळी करू शकतात.अशा वेळी सर्व फलंदाजांना मुक्त टोलवाटोलवी करायला सांगायचं आणि त्याच्या नादात विकेट्स आणि पर्यायानं मॅचही गमवायची.कारण त्यांच्या समोर असते ती कपिल देव ची 1983 वर्ल्ड कप मधली झिम्बाब्वेच्या विरुद्ध केलेली 175 धावांची खेळी, किंवा युवराज सिंग आणि धोनीची सामना जिंकणारी फटकेबाजी.लक्षात घ्या मित्रांनो या अशा प्रकारच्या हाराकीरी खेळयांनी आपल्याला फक्त दहा टक्के मॅचेस मध्ये विजय मिळाला आहे उरलेल्या 90 टक्के मध्ये आपण हरलोय. तेव्हा संयम बाळगा हर्ड इम्युनिटी आणि वॅक्सिंस येणारच आहेत तोपर्यंत पिच कशी आहे, हे त्यावर बॉल स्पिन होतोय की टर्न,बॉलर्स कोण कोण आहेत, फिल्डिंग साईडचे कच्चे दुवे काय आहेत याचा अंदाज घ्या,आणि आपली विकेट शाबूत ठेवा हर्ड इम्युनिटी आणि लस आली की कराना फटकेबाजी, मग विजय आपलाच आहे. समजल मित्रांनो? काळजी घ्या,नमस्कार!

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ