Skip to main content

Posts

चहा

चहा आज सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर आईच्या हातचा पहिल्या वाफेच्या चहाचा आस्वाद घेत आणि सोबत चौकीदाराने जिन्याच्या जाळीत अडकवलेले वर्तमानपत्र चाळीत गच्चीतल्या झोपाळ्यावर बसलो होतो,आणि गर्मीनं दिवसभर अंगाची लाही लाही करणाऱ्या ग्रीष्म ऋतूच्या सकाळच्या वेळच्या थंडगार झुळुकेची मजा घेत होतो. सुरुवात करतांना पहिला घोट बशीत ओतलेल्या चहाचा घ्यायचा आणि एकदा तो किती गरम आहे याचा अंदाज आला,की उरलेला मग कपाने प्यायचा हा शिरस्ता! यामागे दोन उद्देश : एक,जीभ भाजण्याची भीती नाही,आणि दोन,कपातल्या चहाची लेव्हल कमी झाल्याने पेपरात अर्धे लक्ष्य असल्यामुळे हिंदकळून गरम चहा अंगावर सांडण्याचीही भीती नाही.असो. दोन वर्षांपूर्वी केरळ ट्रीपला गेलो असतांना, मुन्नारला भेट दिली होती,त्याठिकाचे सुंदर चहाचे मळे आणि चहा बनवण्याच्या फॅक्ट्रीची भेट आठवली.तिथे ऐकलेल्या चहाच्या इतिहासाची उजळणी थोडक्यात करतो. कॅमेलिया सायनेन्सिस असे बोटॅनिकल नाव असणाऱ्या चहाचा उगम हजारो वर्षांपूर्वी चीनमध्ये झाला.त्यानंतर जवळजवळ जगातील सर्वच देशात त्याचा वापर होऊ लागला.चहाच्या उत्पादनावरील चीनची मक्तेदारी संपवण्यास ब्रिटिशांनी भारत आ...

सिझेरियन, धरलं तर चावतंय,सोडलं तर पळतंय!

सिझेरियनचा उल्लेख इतिहासात प्रथम १५८१ व १५९८ सालात मिळतो.सिझेरीयन या शब्दाचा उगम नक्की माहीत नसला तरी ज्युलियस सिझरचा जन्म या प्रकाराने झाला अशी वदंता आहे.सिझेरियन शब्द लॅटिन भाषेतील कॅडेर (Cadere) या शब्दावरून आला असावा.कॅडेर म्हणजे कापणे(To cut)अशा प्रकारे जन्मलेल्या मुलांना सिझन्स (Caesons)म्हणतात.बऱ्याच धर्मातील पौराणिक कथांमधून पोट कापून देवी-देवतांच्या जन्माच्या कथा आहेत,उदा.ग्रीक पौराणिक कथेत त्यांच्या औषधशास्त्राचे देव अस्क्लेपियस यांचा जन्म त्यांचे वडील अपोलो यांनी त्यांची आई कोरोनीस यांचे सिझेरियन करून केला.नोंदविल्या गेलेली सिझेरियन डिलिव्हरी सन १८०० च्या काळात आढळते. सन १८४६ मध्ये भूल देण्यासाठी "ईथर" चा शोध लागला.त्यानंतर "क्लोरोफॉर्म" चा वापर राणी व्हिक्टोरियाने आपल्या दोन्ही अपत्यांच्या डिलीवरीसाठी केला. त्यावेळी मोठा प्रश्न होता जीवघेणा रक्तस्त्राव आणि जखमेत होणारा जंतुसंसर्ग!(Infection) १८६० मध्ये सर जोसेफ लिस्टर यांनी त्यासाठी कार्बोलीक ऍसिडचा वापर सुरू केला त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करतांना दरवेळी नवीन धुतलेले,स्वच्छ  कपडे वापरणे,हातमोजे बदल...

डॉक्टर्स डे!

१ जुलै २०१३. डॉक्टर्स डे!  भारत रत्न डॉ.बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस व पुण्यतिथी (दोन्ही एकाच दिवशी) भारतभर त्यांच्या सन्मानार्थ "डॉक्टर्स डे" म्हणून साजरा केल्या जातो. भुसावळ इंडियन मेडिकल असोसिएशन ने डॉ.प्रवीण महाजन यांच्या धन्वंतरी ब्लड बँकेच्या विद्यमाने त्यादिवशी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं,आयएमए सभागृहात. त्यात भुसावळ आयएमए च्या सर्व सदस्यांनी रक्तदान करण्याचे ठरविले होते. मी व सुजातानीही सायंकाळी साडेचारच्या सुमारास जाऊन रक्तदान केले. त्यानंतर चहा-कॉफी आणि जमलेल्या डॉक्टर मंडळींशी गप्पागोष्टी असा कार्यक्रम आटोपून आम्ही स्कुटरवर घरी जायला  निघालो. हंबर्डीकर चौकात दत्त बेकरीच्या समोर बरीच गर्दी पाहिली आणि काय भानगड आहे हे पहायला आम्ही थांबलो.पाहतो तर एक विशीचा तरुण रस्त्यात पडला होता आणि लोक त्याला कांदा-चप्पल सुंघव असा प्रकार करत होते. (अशा वेळी बहुतेक लोक नुसते बघ्यांचे काम करत असतात पण काही हुशार लोक '"चक्कर आली असेल,पाणी पाजा","ए,पाणी शिंपडा तोंडावर,आत्ता उठेल","कांदा सुंघवा,नाहीतर चामड्याची चप्पल आणा"असे सर्व अशास्त्रीय उद...

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

*"अनुसूयाबाई"*

१४ फेब्रुवारी १९९१. आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता,कारण सुजाता आणि मधुरा औरंगाबादहून भुसावळला आले होते.सुजाता घाटी हॉस्पिटलला एम.डी. करत होती आणि मधुरा नऊ महिन्याची होती फक्त,त्यामुळे तिच्याचजवळ औरंगाबादला रहायची.सुजाताचे वडील,मेजर दिनकरराव बाब्रस यांचे घर घाटी हॉस्पिटलच्या जवळच असल्यामुळे मधुराला तिथेच ठेवणे सोपे गेले.दिनकररावांनी त्या सुमारास मारुती ८०० ही त्यांची पहिली-वहिली नवी कोरी गाडी घेतली होती आणि ते स्वतः गाडी चालवीत सुजाता व लहानग्या मधुराला घेऊन आले होते एक दिवसाकरता फक्त- कारण....त्या दिवशी सुजाताचा वाढदिवस होता!🎂 त्या दिवशी आम्ही ओपीडीही कमीच बघायचे ठरवले होते आणि एकही ऑपरेशन ठेवले नव्हते,कारण,जास्तीतजास्त वेळ मधुरा सोबत घालवायचा होता! एकंदरीत सर्व आनंदीआनंद होता. सकाळचे साडेदहा वाजले होते,आमचे पेशन्ट पाहणे सुरू झाले होते.सर्व कसे छान,आरामात सुरू होते.एवढ्यात बाहेर काहीतरी आरडाओरडा ऐकू आला.जाऊन पहातो तो काय...एका अत्यवस्थ गरोदर स्त्रीला ३-४ माणसे उचलून आणत होती.मी ताबडतोब स्ट्रेचर मागविला आणि  त्या पेशन्टला तपासणी कक्षात आणले. डोंगरकठोरा गावाची आदिवासी स्त्...

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ...

*"नाटक : एका डॉक्टरच्या नजरेतून"*

*"नाटक : एका डॉक्टरच्या नजरेतून"* महाराष्ट्र,मराठी माणूस आणि रंगभूमी यांचं एक अतूट नातं आहे.महाराष्ट्रानी एकाहून एक दिग्गज कलाकार  आपल्याला दिले आहेत आणि आपणही त्यांच्या अजरामर कलाकृतींना भरभरून प्रतिसाद देतांना त्यांच्याशी जणू समरसच झालो आहोत.नाटक......मग ते रंगभूमीवरील असो,टीव्ही मालिकेतील असो,की सिनेमातील असो,त्या गोष्टी अगदी प्रत्यक्षातच घडतायत असे तात्पुरते वाटणे यातच त्यांचे यश आहे! एक डॉक्टर या नात्यानं याकडे पाहतांना एक विचार मनात येतो : रंगभूमीवरील घटना या पात्रांमुळे वास्तविक असल्याचा आभास निर्माण होतो,पण प्रत्यक्ष  आयुष्यात,जग या एका विशाल रंगमंचावर आपण सर्वच जण नट-नट्या म्हणून भूमिका निभावत असतो. जन्मल्यानंतर थोड्याच दिवसात आपल्याला या नाटकाचे धडे मिळू लागतात.नाटक करून,म्हणजे रडून,जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे,त्याशिवाय कुणी दूध पाजणार नाही,ओले कपडे बदलून देणार नाही,बाहेर फिरवणार नाही- इथून श्रीगणेशा होतो नाटकाचा. थोडं मोठं झाल्यावर हवं त्या गोष्टी मिळण्यासाठी आई-वडिलांकडे हट्ट करणे,शाळेत जायचा कंटाळा आल्यावर पोट दुखण्याचे नाटक करणे,शाळेत उशीर झाल्यावर...