*"नाटक : एका डॉक्टरच्या नजरेतून"*
महाराष्ट्र,मराठी माणूस आणि रंगभूमी यांचं एक अतूट नातं आहे.महाराष्ट्रानी एकाहून एक दिग्गज कलाकार आपल्याला दिले आहेत आणि आपणही त्यांच्या अजरामर कलाकृतींना भरभरून प्रतिसाद देतांना त्यांच्याशी जणू समरसच झालो आहोत.नाटक......मग ते रंगभूमीवरील असो,टीव्ही मालिकेतील असो,की सिनेमातील असो,त्या गोष्टी अगदी प्रत्यक्षातच घडतायत असे तात्पुरते वाटणे यातच त्यांचे यश आहे!
एक डॉक्टर या नात्यानं याकडे पाहतांना एक विचार मनात येतो : रंगभूमीवरील घटना या पात्रांमुळे वास्तविक असल्याचा आभास निर्माण होतो,पण प्रत्यक्ष आयुष्यात,जग या एका विशाल रंगमंचावर आपण सर्वच जण नट-नट्या म्हणून भूमिका निभावत असतो.
जन्मल्यानंतर थोड्याच दिवसात आपल्याला या नाटकाचे धडे मिळू लागतात.नाटक करून,म्हणजे रडून,जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे,त्याशिवाय कुणी दूध पाजणार नाही,ओले कपडे बदलून देणार नाही,बाहेर फिरवणार नाही- इथून श्रीगणेशा होतो नाटकाचा. थोडं मोठं झाल्यावर हवं त्या गोष्टी मिळण्यासाठी आई-वडिलांकडे हट्ट करणे,शाळेत जायचा कंटाळा आल्यावर पोट दुखण्याचे नाटक करणे,शाळेत उशीर झाल्यावर मास्तरांना थापा मारणे,मित्र-मैत्रिणींसोबत मनासारखं होण्यासाठी रुसणं-फुगणं, या सर्वांसाठी ही कला वाढीस लागते.पुढे नोकरी-व्यवसायात आपल्या सहकार्यांशी,वरिष्ठांशी,गिऱ्हाईकांशी बोलतांना आणि यश- बढती मिळवण्यासाठी तर या कलेचा खूपच उपयोग होतो.
प्रत्येक व्यावसायिकासारखंच डॉक्टरलाही एक उत्कृष्ट कलाकार असणं आवश्यक असतं. डॉक्टर ही व्यक्ती जरी मानवच असली तरी समाजानी त्याला देवदूताची भूमिका दिली आहे,म्हणूनच स्वतःची दुःखे बाजूला ठेवून,चेहेऱ्यावर स्मित ठेवून रुग्णाला सामोरं जावं लागतं.रुग्णांच्या वेदनांशी समरस होवून त्याला दिलासा दिला की पुन्हा मुखवटा बदलून स्वतःच्या निजी आयुष्यातील वेगळ्या भूमिकेत सादर करावं लागतं. आई-वडील,पत्नी आणि मुलं, यांच्याशी वागतांना एक व्यक्तिमत्व,मित्र आणि जवळचे नातेवाईक यांच्यासोबत एक वेगळा रोल,रुग्णांशी वागतांना ममतेची भूमिका आणि समाजासमोर एक आदर्श व्यक्ती असं बहुआयामी चित्र त्याला साकारावं लागतं. इतरांना आनंद देण्यातच स्वतःचा आनंद त्याला शोधावा लागतो.
खरं तर जगाच्या या विशाल रंगभूमीवर आपण जरी जन्मभर नाटक करीत असलो,तरी,निर्माता-निर्देशक "तो" आहे हे निर्विवाद सत्य आहे.
आपली एन्ट्री,एक्झिट आणि कोणती भूमिका आपल्या वाट्याला येणार,हे सर्वस्वी त्याच्या हातात आहे.
एन्ट्री हा नशिबाचा भाग आहे.कोणत्या कुटुंबात,कोणत्या मातेच्या पोटी जन्म मिळतो हे आपल्या हातात नाही.
कुटुंब शिक्षित-अशिक्षित,सधन की निर्धन,देश विकसित की अविकसित हेही आपल्या हातात नाही.
मात्र,आहे त्या परिस्थितीत आलेल्या संधीचा फायदा घेत आपल्या कलागुणांवर स्वतःचा विकास करणे आपल्या हातात असते. यात आपले नाट्य कौशल्य महत्वाचे योगदान देते आणि आपण यशस्वी किंवा अयशस्वी गणल्या जातो.
आता एंट्रीप्रमाणे एक्झिटही आपल्या हातात नाही,तेही निर्माता-निर्देशकच ठरवतो आणि तेही,काही पूर्वसूचना न देता! तुमचं कुणीही ऐकत नाही,सर्व रोल अपुरे-अर्धवटच टाकून निरोप घ्यावाच लागतो.तुम्ही आरडाओरडा करण्यासाठी तोंड उघडलं की लोक त्यात तुळशीचं पान आणि गंगाजल टाकून झटपट खांद्यावर उचलून मोकळे!
जर रंगभूमीवरील एन्ट्री आणि एक्झिट आपल्या हातात नाही तर मग आपली जी थोडीथोडकी भूमिका-रोल आहे तो अजरामर करण्यासाठी आपण मेहनत करावयास हवी.चांगल्या कामासाठी लोकांना एकत्र आणणं, आपल्याला जे-जे येतं त्याचा इतरांच्या भल्यासाठी वापर करणं, परिस्थिती जर रडण्यासाठी शंभर कारणं देत असली तर तिला हसण्यासाठी हजार कारणं दाखविणे, भीती-नैराश्याला मागं टाकून श्रद्धा-विश्वासाच्या बळावर जगाला सामोरं जाणं आणि निर्मात्याला सर्व जगाला या आनंदी नाटकाचा '"फ्री पास" देणं भाग पाडणं इतकं तर नक्कीच आपल्या हातात आहे.
एखाद्या व्यक्तीला निखळ-निरागसपणे हसतांना पाहणं ही गोष्ट मला खूप सुंदर वाटते; आणि त्या हसण्यामागचं कारण जर मी स्वतःच असेल तर?
अधीकच सुंदर!!!!🙏🙏

छान....विचार करण्याजोगे लिखाण
ReplyDeleteCasino at Harrah's Tunica - Mapyro
ReplyDeleteHarrah's Tunica Resort & Casino is located on the 안산 출장마사지 Mississippi River in Tunica Resorts, 군포 출장샵 MS. This casino 세종특별자치 출장안마 is owned and operated by the Tunica 동두천 출장마사지 Band 평택 출장마사지 of