Skip to main content

वकिलसाहेब

मित्रांनो,आमच्या डॉक्टरी व्यवसायात निरनिराळे बरे-वाईट अनुभव येतात,काही गमतीदार असतात. त्यातील एक नेहेमीचा अनुभव म्हणजे पेशन्टसोबत येणारे नातेवाईक अथवा मित्र आपण पेशन्ट तपासत असतांना स्वतःचेच प्रॉब्लेम्स सांगत बसतात किंवा वजनाचा काटा दिसला की स्वतःचे वजन करून घेतात आणि माझेही बीपी तपासून घ्या असा आग्रह करतात,त्यानी मूळ पेशन्टच्या आजाराचे गांभीर्यच नष्ट होते,तो खट्टू होतो आणि डॉक्टरचाही विनाकारण वेळ जातो,असो. यावर चर्चा होत असताना मला अडतीस वर्षांपूर्वीची एक माझ्यासोबत घडलेली गोष्ट आठवली,ती शेयर करतोय.

1984 ची गोष्ट आहे,आम्ही सर्व तेंव्हा इंटर्नशिप करत होतो आणि रिकाम्या वेळात मी गोवर्धन सरांकडे (त्यावेळचे अतिशय नावाजलेले सर्जन)सर्जरी शिकायला जायचो,त्यावेळी त्यांच्या ओपीडीतही असायचो. त्यांच्याकडे फार हाय प्रोफाइल क्लायंट्स असायचे.
एकदा एक प्रथितयश वकिलसाहेब आले,तपासणी झाल्यावर सरांनी माझी ओळख करून दिली,तेंव्हा कळले की आमच्या धंतोलीतील घराजवळच या महाशयांचा बंगला आहे.गप्पा झाल्या,मग बाहेर गेल्यावर त्यांनी मला बोलावले,आणि म्हणाले : यंग मॅन,आपण एक काम करूया,मला ब्लड प्रेशर आहे,गोळ्या सुरू आहेत,पण रोज सकाळी नऊ वाजता घरून निघालास,की माझ्याकडे ब्लड प्रेशर तपासायला येत जा,म्हणजे माझे काम तर होईलच,पण तुलाही चांगली प्रॅक्टिस होईल बीपी तपासायची! अँड,बी नाईनीश,यू नो,आय ऍम द मोस्ट सॉट आफ्टर लॉयर ऑफ नागपूर,हा,हा! अँड येस,यू कॅन अल्सो हॅव दी प्लेझर ऑफ हॅविंग ए कप ऑफ कॉफी विथ मी.(खरं तर दोन पिव्वर मराठी माणसं एकमेकांशी इंग्रजीत का बोलतात हे मला न सुटलेलं कोडं आहे!)

बरंय बुवा,मी मनाशी म्हणलो,बरी प्रॅक्टिस होईल बीपी तपासायची,जाऊया!

दुसऱ्या दिवशी सकाळी बरोब्बर नऊ वाजता मी हजर माझं डायमंड चं नवीन मर्क्युरी बीपी अप्राट्स आणि स्टेथो घेऊन.
साहेब झोपाळ्यावर बसून नाईट गाऊन घालून पेपर वाचत बसले होते,हातात कॉफीचा कप.

वेलकम डॉक, हाऊ आर यू? टुडे आय ऍम लिटल रिलॅक्सड,माय असिस्टंटस आर इनफ फॉर टूडेज केसेस,बट आय अंडरस्टँड,युवर टाईम इज प्रिशियस, सो,गेट ऑन विथ द वर्क.(विदाऊट दी प्लेझर ऑफ हॅविंग कॉफी विथ दी मिलोर्ड!)

म्हंटलं,आत या आणि दिवाणखान्यात दिवाणावर झोपा. त्यांना झोपवलं,बीपीचा कफ बांधला,आणि पहायला सुरवात करणार तेव्हढ्यात ते म्हणाले,ओह,आय फरगॉट टू टेल यू,आय हॅव ऍन इंपोर्टेड मशीन,स्पिघनोमॅनोमीटर,टू बी स्पेसिफिक, गीवन बाय माय ब्रदर इन लॉ हू स्टेज इन इंग्लड,यू नो,आय डोन्ट ट्रस्ट इंडियन मशिन्स!

मग त्या मशिननी मी बीपी पाहिलं,दोनदा-तीनदा पाहिलं,आणि गंभीर चेहरा केला,म्हंटलं,असेच चुपचाप झोपून रहा,निवांत,मुळीच उठायचे नाही,फारच वाढलंय बीपी! काकूंना बोलवलं,म्हणालो,अहो,फार वाढलंय ब्लड प्रेशर,आत्ताच्या आत्ता तुमच्या फिजिशियन कडे ऍडमिट व्हावं लागेल.

अरे,पण मला काही त्रास तर होत नाहीये.(ऑब्जेक्शन युवर ऑनर)

अहो,हे बीपी असंच घातक असतं, काही त्रास होत नाही म्हणून माणूस दुर्लक्ष करतो आणि मग फटट्दिशी फाटते मेंदूची नस,की झाला हिमरेज आणि प्यारालिसिस किंवा गप्पकन मासिव्ह हार्ट अटॅक, की खेळ खल्लास! आहात कुठं!! (ऑब्जेक्शन ओव्हररुल्ड!)

ते काही नाही,आत्ताच्या आत्ता फोन करून अंबुलन्स बोलवा आणि अशाच स्थितीत स्ट्रेचरवर शिफ्ट करा,उठू मुळीच नका.
आणि जवळच्या नातेवाईकांनाही बोलावून घ्या,उगाच कशाला रिस्क बावा!!

ते फोनाफोनी(त्यावेळी फक्त लँड लाईन फोन होते आणि तेही बोटावर मोजण्याइतक्याच लोकांकडे,यांच्याकडे अर्थातच होता) करण्यात गुंतल्यावर मी हळूच मला केस आहे सरांकडे म्हणून काढता पाय घेतला.

नंतर काय झाले मला माहित नाही,पण त्यांनतर माझ्या वाटे ते पुन्हा गेले नाहीत.त्यांच्या नात्यात कुणीतरी एक मुलगी होती,ती माझ्या गळ्यात मारायचा त्यांचा विचार होता असे मला गोवर्धन सरांच्या कम्पाउंडरने नंतर सांगितले.

सुटलो त्याहीतून बावा, यू नो,आय  एम अफ्रेड ऑफ पीपल हू हॅव रिलेटिव्हज इन इंग्लड!😜

स्टेचुटरी वार्निंग :
वरील वर्णन केलेली घटना जरी खरी असली आणि कुण्या व्यक्तींशी त्याचे साधर्म्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा.

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

Senseless Sense of Well Being

Hello friends. There are a few side effects of development. The one I am seeing obviously is the spurt of Wellness-Fitness centers,Gymnasiums,Spiritual Gurus holding Satsangs,verious diet planners,Weight loss-inch loss centres,Personality development courses,Career guidance centres & many more.We feel that unless we do such courses,we & our children cannot progress, be successful,wealthy & achieve peace of mind. I wonder how the  previous generation managed to do well without having the advantages of these schools. The Tatas,Birlas,Ambanis, Mahindras must have been real lucky,isn't it! Infact,the advent of internet,it's widespread use, resulting in an outburst of knowledge(many times incomplete & confusing) has changed the psyche of the people & these agencies take advantage of this situation to make money. This has become a status symbol amongst the riches,who can afford,but the poor are also lured & made to spend in an attempt to uplift their ...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...