Skip to main content

"पाणीपुरी"



आजची गम्मत सांगतो :
खूप दिवसांनी काही कारणांनी बाजारात जायचा प्रसंग आला,तहसीलदार कचेरी समोर माझा आवडता पाणीपुरीवाला दिसला, म्हंटलं चोपावी पाणीपुरी (असं चुपचाप, न सांगताच हा कार्यभाग साधावा लागतो, नाहीतर पावसाळ्याचे दिवस आहेत,काविळीची साथ सुरु आहे,कसलं ते घाण पाणी,शी, कुठे गटारीच्या काठी उभी असते ती गाडी,डॉक्टर असून समजत नाही का? वगैरे गोष्टींचा सुजाताकडून भडिमार होतो आणि वर,मी छान घरीच बनवीत जाईन आता(ही धमकी) आता काय सांगू यांना,त्या भय्याच्या कळकट हातानी दोन मडक्यातल्या पाण्यात बुचकळवून काढलेल्या पाणीपुरीची चव घरच्या चकाचक स्टेनलेस स्टीलच्या भांड्यातील पाण्याला कुठून येणार ते?)
असो, तर सांगायचा मुद्दा हा होता की पाणीपुरीसाठी मी भय्याच्या गाडीजवळ गेलो, तिथे बायकांची बरीच गर्दी होती,बऱ्याच माझ्या पेशन्टस होत्या,आशा वाटली की नंबर जरा प्रयोरिटीने लागेल म्हणून, पण कसलं काय, जरा म्हणून कुणी मागे हटायला तयार नाही,उलट नजरेत बदला घेतल्याचा आंनद (तुमच्या दवाखान्यात आम्ही नाही बसत तासनतास,नंबर लावून, आता भोगा.)
राहिलो बुवा उभा,केविलवाणा होऊन माझा नंबर यायची वाट पाहत.

तसं, पाणीपुरी मला जरी फार आवडत असली, तरी त्याबद्दल एक प्रश्न आहे माझ्या मनात की तिचा आकार एवढा मोट्ठा का असतो?हे लोक आम्हाला काय मगरीच्या कुळातले समजतात काय? मोठ्ठ तोंड उघडून कशीबशी तोंडात ढकलली आणि जबडा बंद करण्याचा प्रयत्न केला, की ती पुरी फुटून ते तिखटजाळ पाणी सरळ श्वासनलिकेत दाखल, आणि मग तो जीवघेणा ठसका! आजूबाजूच्या लोकांनी सहानुभूती दाखवावी ना,छे,त्यांच्या चेहऱ्यावर आंनद की आता हा थांबवणार आणि आपला नंबर लागणार. जाऊद्या, ती स्टेज यायचीच बाकी कारण समोरच्या बायका थांबायलाच तयार नाहीत.पाहता पाहता मला या बायकांची पाणीपुरी खायची हातोटी आणि अपार कौशल्य नजरेत भरले : एक पुरी तोंडात, एक हातात,आणि तिसरी प्लेटमध्ये!शेजारचीला देऊन भय्या आपली पुरी समोर करायच्या आत यांची प्लेट त्याच्यापुढे! ठसका न लागू देता मटामटा खाणं सुरु,व्वा! बरं, तीनचार लोक लायनीत असतांना आपला नंबर या बायका आणि तो भय्या बरोब्बर लक्षात ठेवतात,हां, आणि कुणाच्या किती पुऱ्या झाल्या आणि किती बाकी राहिल्या हा हिशोब ही चुकत नाही कधी!
पाणीपुरी खाणं झाल्यावर न चुकता भय्याकडून "पपडी" किंवा "सुक्की पुरी"खायचीच असते(ती हिशोबात नसते बरं का!)

तर काय सांगू मंडळी आज (आजही) माझा नंबर लागला नाही कारण माझा नंबर येईपर्यंत पाणी सम्पले होते.😔

जड पावलांनी मी घराकडे वळलो,आणि मग मनात प्रश्न आला, ही मगरीसारख्या जबड्यानी टपाटप पाणीपुऱ्या खाऊन माझ्या तोंडाचा घास हिरावणारी बाई काल मला क्लिनिकमध्ये रिक्वेस्ट करत होती की कॅल्शियम च्या गोळ्या जरा छोट्या नाहीका देता येणार, मोठ्या गोळ्या तोंडात जात नाहीत!

आहेका उत्तर कुणाकडे?

Comments

  1. Hello Sir. I am Dr. Omkar Halwai, an ENT Surgeon practising in Mumbai. I used to work as Consultant and Assistant Professor in Somaiya Medical College under Dr. Dinesh Vaidya Sir. He told me about your blog yesterday and forwarded me the link. Read the first 3 articles just now.

    I must say that you write very well Sir. Your sense of humour is simply brilliant and it hits home even more because it is in Marathi.


    Also, there is a strong sense of sincerity and honesty which comes through in your writings.

    I will definitely be following your blog from here onwards.

    Me and Vaidya Sir share a liking of literature and cinema among many other things and we discuss about these very often.
    Inspite of me having left Somaiya, we are still in touch. He is a more of a mentor and a friend to me. Thanks to him, I got to know about you.

    I also write occasionally and my blog link is
    ohalwai.blogpost.in.
    (Although I write in English)

    Please go through it at your leisure.

    Regards,
    Dr. Omkar Halwai.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks dear Omkar,nice to know you liked my ideas.I will surely read your blog & will revert back.Dinesh is one of the finest souls & me proud to be friends.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनक...