Skip to main content

*"नाटक : एका डॉक्टरच्या नजरेतून"*

*"नाटक : एका डॉक्टरच्या नजरेतून"*

महाराष्ट्र,मराठी माणूस आणि रंगभूमी यांचं एक अतूट नातं आहे.महाराष्ट्रानी एकाहून एक दिग्गज कलाकार  आपल्याला दिले आहेत आणि आपणही त्यांच्या अजरामर कलाकृतींना भरभरून प्रतिसाद देतांना त्यांच्याशी जणू समरसच झालो आहोत.नाटक......मग ते रंगभूमीवरील असो,टीव्ही मालिकेतील असो,की सिनेमातील असो,त्या गोष्टी अगदी प्रत्यक्षातच घडतायत असे तात्पुरते वाटणे यातच त्यांचे यश आहे!

एक डॉक्टर या नात्यानं याकडे पाहतांना एक विचार मनात येतो : रंगभूमीवरील घटना या पात्रांमुळे वास्तविक असल्याचा आभास निर्माण होतो,पण प्रत्यक्ष  आयुष्यात,जग या एका विशाल रंगमंचावर आपण सर्वच जण नट-नट्या म्हणून भूमिका निभावत असतो.

जन्मल्यानंतर थोड्याच दिवसात आपल्याला या नाटकाचे धडे मिळू लागतात.नाटक करून,म्हणजे रडून,जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे,त्याशिवाय कुणी दूध पाजणार नाही,ओले कपडे बदलून देणार नाही,बाहेर फिरवणार नाही- इथून श्रीगणेशा होतो नाटकाचा. थोडं मोठं झाल्यावर हवं त्या गोष्टी मिळण्यासाठी आई-वडिलांकडे हट्ट करणे,शाळेत जायचा कंटाळा आल्यावर पोट दुखण्याचे नाटक करणे,शाळेत उशीर झाल्यावर मास्तरांना थापा मारणे,मित्र-मैत्रिणींसोबत मनासारखं होण्यासाठी रुसणं-फुगणं, या सर्वांसाठी ही कला वाढीस लागते.पुढे नोकरी-व्यवसायात आपल्या सहकार्यांशी,वरिष्ठांशी,गिऱ्हाईकांशी बोलतांना आणि यश- बढती मिळवण्यासाठी तर या कलेचा खूपच उपयोग होतो.

प्रत्येक व्यावसायिकासारखंच डॉक्टरलाही एक उत्कृष्ट कलाकार असणं आवश्यक असतं. डॉक्टर ही व्यक्ती जरी मानवच असली तरी समाजानी त्याला देवदूताची भूमिका दिली आहे,म्हणूनच स्वतःची दुःखे बाजूला ठेवून,चेहेऱ्यावर स्मित ठेवून रुग्णाला सामोरं जावं लागतं.रुग्णांच्या वेदनांशी समरस होवून त्याला दिलासा दिला की पुन्हा मुखवटा बदलून स्वतःच्या निजी आयुष्यातील वेगळ्या भूमिकेत सादर करावं लागतं. आई-वडील,पत्नी आणि मुलं, यांच्याशी वागतांना एक व्यक्तिमत्व,मित्र आणि जवळचे नातेवाईक यांच्यासोबत एक वेगळा रोल,रुग्णांशी वागतांना ममतेची भूमिका आणि समाजासमोर एक आदर्श व्यक्ती असं बहुआयामी चित्र त्याला साकारावं लागतं. इतरांना आनंद देण्यातच स्वतःचा आनंद त्याला शोधावा लागतो.

खरं तर जगाच्या या विशाल रंगभूमीवर आपण जरी जन्मभर नाटक करीत असलो,तरी,निर्माता-निर्देशक "तो" आहे हे निर्विवाद सत्य आहे.
आपली एन्ट्री,एक्झिट आणि कोणती भूमिका आपल्या वाट्याला येणार,हे सर्वस्वी त्याच्या हातात आहे.
एन्ट्री हा नशिबाचा भाग आहे.कोणत्या कुटुंबात,कोणत्या मातेच्या पोटी जन्म मिळतो हे आपल्या हातात नाही.
कुटुंब शिक्षित-अशिक्षित,सधन की निर्धन,देश विकसित की अविकसित हेही आपल्या हातात नाही.
 मात्र,आहे त्या परिस्थितीत आलेल्या संधीचा फायदा घेत आपल्या कलागुणांवर स्वतःचा विकास करणे आपल्या हातात असते. यात आपले नाट्य कौशल्य महत्वाचे योगदान देते आणि आपण यशस्वी किंवा अयशस्वी गणल्या जातो.
आता एंट्रीप्रमाणे एक्झिटही आपल्या हातात नाही,तेही निर्माता-निर्देशकच ठरवतो आणि तेही,काही पूर्वसूचना न देता! तुमचं कुणीही ऐकत नाही,सर्व रोल अपुरे-अर्धवटच टाकून निरोप घ्यावाच लागतो.तुम्ही आरडाओरडा करण्यासाठी तोंड उघडलं की लोक त्यात तुळशीचं पान आणि गंगाजल टाकून झटपट खांद्यावर उचलून मोकळे!

जर रंगभूमीवरील एन्ट्री आणि एक्झिट आपल्या हातात नाही तर मग आपली जी थोडीथोडकी भूमिका-रोल आहे तो अजरामर करण्यासाठी आपण मेहनत करावयास हवी.चांगल्या कामासाठी लोकांना एकत्र आणणं, आपल्याला जे-जे येतं त्याचा इतरांच्या भल्यासाठी वापर करणं, परिस्थिती जर रडण्यासाठी शंभर कारणं देत असली तर तिला हसण्यासाठी हजार कारणं दाखविणे, भीती-नैराश्याला मागं टाकून श्रद्धा-विश्वासाच्या बळावर जगाला सामोरं जाणं आणि निर्मात्याला सर्व जगाला या आनंदी नाटकाचा '"फ्री पास" देणं भाग पाडणं इतकं तर नक्कीच आपल्या हातात आहे.

एखाद्या व्यक्तीला निखळ-निरागसपणे हसतांना पाहणं ही गोष्ट मला खूप सुंदर वाटते; आणि त्या हसण्यामागचं कारण जर मी स्वतःच असेल तर?
अधीकच सुंदर!!!!🙏🙏

Comments

  1. छान....विचार करण्याजोगे लिखाण

    ReplyDelete
  2. Casino at Harrah's Tunica - Mapyro
    Harrah's Tunica Resort & Casino is located on the 안산 출장마사지 Mississippi River in Tunica Resorts, 군포 출장샵 MS. This casino 세종특별자치 출장안마 is owned and operated by the Tunica 동두천 출장마사지 Band 평택 출장마사지 of

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

Senseless Sense of Well Being

Hello friends. There are a few side effects of development. The one I am seeing obviously is the spurt of Wellness-Fitness centers,Gymnasiums,Spiritual Gurus holding Satsangs,verious diet planners,Weight loss-inch loss centres,Personality development courses,Career guidance centres & many more.We feel that unless we do such courses,we & our children cannot progress, be successful,wealthy & achieve peace of mind. I wonder how the  previous generation managed to do well without having the advantages of these schools. The Tatas,Birlas,Ambanis, Mahindras must have been real lucky,isn't it! Infact,the advent of internet,it's widespread use, resulting in an outburst of knowledge(many times incomplete & confusing) has changed the psyche of the people & these agencies take advantage of this situation to make money. This has become a status symbol amongst the riches,who can afford,but the poor are also lured & made to spend in an attempt to uplift their ...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...